Class 7 | MATHS |
Chapter | परिमिती व क्षेत्रफळ |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 24 |
Academic Year | 2023-24 |
एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली, तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल?
एका चौरसाची बाजू तिप्पट केली, तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल?
शेजारी मैदानाची आकृती दिली आहे. त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत. त्यावरून मैदानाची परिमिती काढा.
1 मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे समान आकारांचे चार रुमाल केले. सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल?
एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास, त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा.
एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा.
एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौसेमी आहे. आयताची लांबी 17 सेमी आहे, तर आयताची परिमिती किती?
एका चौरसाची बाजू तिप्पट केली, तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल?
एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती?`
एका त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?`
एका आयताकृती भूखंडाची लांबी 75.5 मीटर व रुंदी 30.5 मीटर आहे. त्याचा दर ₹1000 प्रति चौरस मीटर असल्यास, त्या भूखंडाची किंमत किती?`
आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर व रुंदी 6 मीटर आहे. या सभागृहात 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरश्या बसवायच्या आहेत, तर संपूर्ण सभागृहात किती फरश्या बसतील? या उदाहरणातील चौरसाकृती फरश्या 15 सेमी बाजूच्या घेतल्या, तर किती फरश्या लागतील?`
शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा.
घनाच्या बाजू पुढीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा :
3 सेमी`
घनाच्या बाजू पुढीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा :
5 सेमी
घनाच्या बाजू पुढीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा :
7.2 मी.
घनाच्या बाजू पुढीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा :
6.8 मी.
घनाच्या बाजू पुढीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा :
5.5 मी.`
पुढे इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा:
`12 सेमी, 10 सेमी, 5 सेमी`
पुढे इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा:
5 सेमी, 3.5 सेमी, 1.4 सेमी
पुढे इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा:
2.5 मी, 2 मी, 2.4 मी.
पुढे इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे, त्यावरून त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा:
8 मी, 5 मी, 3.5 मी.
एका आगपेटीची लांबी 4 सेमी, रुंदी 2.5 सेमी व उंची 1.5 सेमी आहे. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे. तर एकूण किती कागद लागेल?
बागेतील पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल? ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे, तर ₹ 150 प्रति चौरस मीटरप्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल?
PROBLEM questions and complete solutions for chapter परिमिती व क्षेत्रफळ of NAVNEET PUBLICATION of Class 7