Class 7 | MATHS |
Chapter | समप्रमाण व व्यस्तप्रमाण |
NAVNEET PUBLICATION | PROBLEM |
Number Of Questions | 9 |
Academic Year | 2023-24 |
एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 15 मजुरांना किती दिवस लागतील?
मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक 10 दिवसांत वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 8 दिवसांत पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत?
मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किमी आहे. ती 12 किमी अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल? तिच्या सायकलीचा वेग ताशी 4 किमी झाला, तर तिला किती वेळ
लागेल?
एका शासकीय गोदामातील धान्यसाठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्यसाठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल?
सुरेश आणि रमेश यांनी ₹ 1,44,000 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला, तर प्रत्येकाला किती नफा मिळाला?
विराट आणि सम्राट यांनी अनुक्रमे ₹ 50,000 व ₹ 1,20,000 गुंतवून व्यवसाय चालू केला. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला, तर प्रत्येकाला किती तोटा झाला?
श्वेता, पीयूष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादरी व टॉवेल विकण्याचा व्यवसाय ₹ 80,000 गुंतवून सुरु केला, त्यांपैकी श्वेताचे भांडवल ₹ 30,000 होते व पीयूषचे भांडवल ₹ 12,000
होते .त्यांना वर्षअखेरीस 24% नफा झाला. तर नचिकेतची भागीदारी किती होती? नचिकेतला
मिळालेल्या नफ्याची रक्कम किती?
अ व ब यांनी मिळालेला ₹ 24,500 नफा 3:7 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर प्रत्येकाने किती रक्कम
निधीसाठी दिली?
जया, सीमा, निखील आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3:4:7:6 या प्रमाणात ₹ 3,60,000 ची भागीदारी केली, तर जयाचे भांडवल किती होते? त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला ,
तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील?
PROBLEM questions and complete solutions for chapter समप्रमाण व व्यस्तप्रमाण of NAVNEET PUBLICATION of Class 7