Class 9 | MATHS |
Chapter | पृष्ठफळ व घनफळ |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 42 |
Academic Year | 2023-24 |
एका इष्टिकाचिती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 20 सेमी, 12 सेमी व 10 सेमी आहे तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौ एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे, तर त्या खोक्याची लांबी किती असेल ?
एका घनाकृतीची बाजू 4.5 सेमी आहे, या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौसेमी आहे तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा.
एका इष्टिकाचितीचे घनफळ 34.50 घन मी असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मी व 1.15 मी आहे तर त्या इष्टिकाचितीची लांबी काढा.
7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ किती?
एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20 सेमी व उंची 13 सेमी आहे तर त्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (`pi` = 3.14 घ्या.)
वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 1980 चौसेमी
असून तळाची त्रिज्या 15 सेमी असल्यास त्या वृत्तचितीची उंची काढा.
(`pi = (22)/7` घ्या)
शंकूच्या तळाची दिलेली त्रिज्या (r) व दिलेली लंब उंची (h) घेऊन त्याची तिरकस उंची (l) काढा.
r = 6 सेमी, h = 8 सेमी
एका शंकूच्या तळाची त्रिज्या 12 सेमी व लंब उंची 16 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची, वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (`pi` = 3.14)
एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 704 चौसेमी व तळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची
काढा.
(`pi = (22)/7` घ्या)
एका शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी आहे आणि शंकूची उंची 28 सेमी असल्यास, शंकूचे
वक्रपृष्ठफळ काढा.
`(pi =(22)/7)`
शंकूची लंब उंची 12 सेमी व तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती ?
एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 चाैसेमी
आणि शंकूच्या तळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर शंकूचे घनफळ
काढा.
(`pi = (22)/7` घ्या)
एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 251.2 चाैसेमी व तळाची त्रिज्या 8 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची व
लंब उंची काढा.
(`pi` = 3.14 घ्या)
6 मी त्रिज्या व 8 मी तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनविण्याचा दर 10 रु प्रति चौरस
मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा.
(`pi`= `(22)/7` घ्या)
शंकूचे घनफळ 6280 घसेमी असून, तळाची त्रिज्या 20 सेमी आहे तर शंकूची लंबउंची काढा. (`pi` = 3.14 घ्या)
शंकूचे वक्रपृष्ठफळ 188.4 चौसेमी व तिरकस उंची 10 सेमी आहे. तर शंकूची लंबउंची काढा.
(`pi` = 3.14 घ्या)
एका शंकूचे घनफळ 1232 घसेमी व उंची 24 सेमी आहे, तर त्या शंकूचे वक्रपृष्ठफळ काढा.
(`pi` = `(22)/7` घ्या)
एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 2200 चौसेमी आहे व तिरकस उंची 50 सेमी आहे तर त्या शंकूचे एकूण पृष्ठफळ व घनफळ काढा. (`pi = (22)/7` घ्या)
एका शंक्कती तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चमी जागा लागते. जर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ किती ?
एका शेतामध्ये गुरांसाठी कोरडा चारा शंक्वाकार रास करून ठेबला असून, राशीची उंची 2.1 मी आहे. तळाचा व्यास 7.2 मीटर आहे, तर चल्याच्या राशीचे घनफळ काढा. पावसाची लक्षणे दिसली तर अशा प्रसंगी हा ढिग प्लॅस्टिकने आच्छादित करायचा असल्यास शेतकऱ्याला किती चौ. मीटर प्लॅस्टिकचा कागद लागेल ? `(pi = (22)/7 व `\sqrt{17.37}` = 4.17 घ्या.)`
एका गोलाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा. `(pi = (22)/7)`
वक्रपृष्ठफळ 1256 चौसेमी असणाऱ्या गोलाची त्रिज्या काढा. `(pi = 3.14)`
एका गोलाची त्रिज्या 21 सेमी आहे, तर त्या गोलाचे घनफळ काढा. `(pi = (22)/7 )`
113040 घसेमी घनफळ असणाऱ्या गोलाची त्रिज्या शोधा. `(pi = 3.14)`
वक्रपृष्ठफळ 314 चौसेमी असणाऱ्या गोलाचे घनफळ किती ? `(pi= 3.14)`
खाली दिलेल्या संख्या गोलांच्या त्रिज्या दर्शवतात. तर त्या गोलांची वक्रपृष्ठफळे व घनफळे शोधा.
4 सेमी . `(pi = 3.14)`
खाली दिलेल्या संख्या गोलांच्या त्रिज्या दर्शवतात. तर त्या गोलांची वक्रपृष्ठफळे व घनफळे शोधा.
9 सेमी. `(pi = 3.14)`
खाली दिलेल्या संख्या गोलांच्या त्रिज्या दर्शवतात.
3.5 सेमी
तर त्या गोलांची वक्रपृष्ठफळे व घनफळे शोधा. `(pi = 3.14)`
5 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. `(pi = 3.14)`
2826 चौसेमी वक्रपृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. `(pi = 3.14)`
38808 घसेमी घनफळ असणाऱ्या गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा. `(pi = 22/7)`
एका अर्धगोलाचे घनफळ `18000 pi` घसेमी आहें, तर त्या गोलाचा व्यास काढा.
0.9 मी व्यास व 1.4 मी लांबी असणाऱ्या रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये सपाट केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ किती ? `(pi = (22)/7 घ्या.)`
एक इष्टिकाचिती आकाराचे घरगुती मत्सालय बनवण्यासाठी 2 मिमी जाडीची काच वापरली. मत्स्यालयाची (च्या. भिंतीची) बाहेरून लांबी, रुंदी ब उंची अनुक्रमे सेंटिमीटरमध्ये `60.4 times 40.4 times 40.2` आहे, तर त्या मत्स्लयात जास्तीत जास्त किती पाणी मावेल ?
एका शंकूच्या तळाची त्रिज्या व लंबउंची यांचे गुणोत्तर 5ः12 आहे. शंकूचे घनफळ 314 घमी असल्यास त्याची लंबउंची व तिरकस उंची काढा. `(pi = 3.14)`
एका गोलाचे घनफळ 904.32 घसेमी आहे तर त्या गोलाची त्रिज्या काढा. `(pi = 3.14)`
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 864 चौसेमी आहे तर त्याचे घनफळ काढा.
ज्या गोलाचे पृष्ठफळ 154 चौसेमी आहे, अशा गोलाचे घनफळ काढा.
एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा.
वर्तुळाकार विहिरीचा आतील व्यास 4.20 मीटर आहे. विहिरीची खोली 10 मीटर आहे. तर त्याचे आतील वक्रपृष्ठकळ किती? विहिरीच्या आतील वक्रपृष्ठाला गिलावा करण्यासाठी प्रतिचौमी 52 रुपये दराने किती खर्च येईल ?
EXERCISE questions and complete solutions for chapter पृष्ठफळ व घनफळ of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9